तब्बल 'इतक्या' शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

धारावीमधील शिवसैनिकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

SHARE

महाराष्ट्रात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार असून शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अस असताना धारावीमधील सुमारे ४०० शिवसैनिकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

शिवसैनिक नाराज

हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार बनवल्यानं खूप नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच, शिवसेनेनं भ्रष्ट आणि प्रतिस्पर्धी पक्षांशी हातमिळवणी करणं गैर असल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेने भ्रष्ट आणि हिंदू विरोधी असलेल्या पक्षांशी हात मिळवणी करणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेतल्यासारखं आपल्याला वाटत असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे.

भाजपात प्रवेश

केवळ सत्तेत यावं म्हणून शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी झाल्याचा आरोपही भाजपात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी झाल्यामुळं नाराज झालेले असंख्य शिवसैनिक शिवसेनेत आहेत.हेही वाचा -

अनुदानाअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट

'पानिपत' सिनेमाचं राज ठाकरेंकडून कौतुकसंबंधित विषय
ताज्या बातम्या