Advertisement

७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये एस. चोकलिंगम, श्रावण हर्डीकर, शितल उगले-तेली, अनिता पाटील, अशा एकूण ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARES

राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये एस. चोकलिंगम, श्रावण हर्डीकर, शितल उगले-तेली, अनिता पाटील, अशा एकूण ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीसंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

बदली झालेले आयएएस अधिकारी पुढीलप्रमाणे:

१) एस. चोकलिंगम यांची जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, पुणे पदावरुन यशदा पुणेच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

२) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

३) श्रावण हर्डीकर यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पी पाटील यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

४) शितल उगले-तेली यांची संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर नियुक्ती.

५) प्रेरणा देशभ्रतार यांची आयुक्त, अपंग कल्याण, पुणे या पदावरुन वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

६) अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

७) एन. के. सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

(7 IAS officer transferred from maharashtra government)


हेही वाचा-

यापुढं महाराष्ट्रात काँग्रेसच एक नंबरचा पक्ष- नाना पटोले

आंदोनकर्त्या शिक्षकांच्या पाठिशी मनसे ठामपणे उभी- अमित ठाकरे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा