Advertisement

Sharad Pawar: शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात होऊन त्यात एक पोलीस कर्मचारी आणि वाहनचालक जखमी झाल्याची घटना सोमवार २९ जून २०२० रोजी घडली आहे.

Sharad Pawar: शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात होऊन त्यात एक पोलीस कर्मचारी आणि वाहनचालक जखमी झाल्याची घटना सोमवार २९ जून २०२० रोजी (a police vehicle in the convoy of ncp chief sharad pawar met with an accident on monday) घडली आहे. शरद पवार पुण्याहून मुंबईत येत असताना बोरघाटाजवळ हा अपघात घडला.  

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने येत होता. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ पवार यांच्या ताफ्यातील पोलिसाची गाडी अचानक घसरून पलटली. हा अपघात घडताच पवार यांच्या ताफ्यातील इतर गाड्यांनी तात्काळ थांबून पलटलेल्या गाडीतील सर्व पोलिसांना बाहेर काढलं. या अपघातात वाहनचालक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने इतर कुणालाही दुखापत झाली नाही. शिवाय गाडीचंही थोडंफार नुकसान झालं आहे. 

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात- शरद पवार

पवार यांची गाडी पुढे होती आणि पलटी झालेली गाडी पाठी मागून येत होती. त्यामुळे पवार यांच्या गाडीला काहीही झालेलं नसून पवार सुखरूप असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अपघात झाल्याचं समजताच शरद पवार यांनी त्यांची गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली आणि त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर पवारांचा ताफा पुन्हा मुंबईकडे रवाना झाल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शरद पवार  साताऱ्याच्या दौऱ्यावर गेले होते.  तिथं त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेच्या कामात  भाग घेतला. त्यानंतर ते पुन्हा पुण्याला आले होते. तर सोमवारी सकाळी शरद पवार पुण्याहून मुंबईला यायला निघाले.  त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला.

हेही वाचा - शरद पवार आमचे राजकीय विरोधक; शत्रू नाहीत- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा