Advertisement

किशोरी पेडणेकरांसह आदित्य ठाकरेंनाही जीवे मारण्याची धमकी

किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा धमकिचे पत्र आले आहे.

किशोरी पेडणेकरांसह आदित्य ठाकरेंनाही जीवे मारण्याची धमकी
SHARES

महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. ३० जूनला म्हणजेच उद्या राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र हे अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं सांगत राज्य सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या सर्व घडामोडीत समोर आलेल्या माहितीनुसार, किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा धमकिचे पत्र आले आहे. पत्रात म्हटलं आहे की, सरकार पडू दे, नाहीतर तुला जीवे मारू. याची आपण गांभीर्याने दखल घेतल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं आहे की, मी लोअर परळच्या माझ्या घरी होते. दोन पोलिकेचे अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा सुरु होती. एक मुलगी पत्र घेऊन आली, पत्र उघडलं, पाहिलं तर पेनाने लिहिलंय. मागे माझं चित्र लावलंय. छोटा एक फोटो क्रॉप केलंय. उरणच्या आमदारांचा आणि त्यांच्या बायकोचा फोटो क्रॉप केलाय. निळ्या पेनाने हे पत्र लिहिलंय. नाव आणि पत्ताही आहे. हा पत्र लिहिणारा दिशाभूल करतोय. असे माथेफिरु समाजात असतील आणि उगाचच धमकावत असतील, तर याची दखल घेतली पाहिजे. आदित्य ठाकरेंनाही धमकी दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, जसं काय महाराष्ट्रात मुघलाई आली आहे, अशा पद्धतीने पत्र आलंय. जाणूनबुजून कुणीतरी हे करतंय. अशा पत्रांना मी घाबरत नाही! पण याची आता दखल घेतली पाहिजे. आता ना.म.जोशी पोलीस स्टेशनला कळवलंय. मला जे गार्ड दिले आहेत, ते स्वतः हे पत्र घेऊन गेलेत. आता जरा हे जास्तच व्हायला लागलं. हे सरकार पडून दे, तुला मारु, तू काय मध्ये बोलते, अशा गलिच्छ भाषेत यातून धमकावण्यात आलं आहे.

यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना धमकी मिळाली आहे. गेल्या वर्षीही शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना धमकी मिळाली होती. पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगून अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे.



हेही वाचा

उद्या शिवसेनेची परीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

उद्या मुंबईत येणार - एकनाथ शिंदे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा