Advertisement

उद्या शिवसेनेची परीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

आता सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

उद्या शिवसेनेची परीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश
SHARES

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे. आता सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेत उद्या म्हणजेच ३० जून रोजी बहुमत चाचणी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. सायंकाळी ५ वाजेपूर्वी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आहेत.

मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे."

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली.

ते म्हणाले की, मी आताच कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, महाराष्ट्रातील जनतेच्या समाधानासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी मी देवीचे आशीर्वाद घेतले, आम्ही सर्व आमदारांना घेऊन अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया पार पडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत, आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील.



हेही वाचा

उद्या मुंबईत येणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेला डोंबिवलीतून धक्का! 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा