Advertisement

घातक उत्तेजक द्रव्य देणाऱ्या व्यायामशाळांवर होणार कारवाई -डॉ. राजेंद्र शिंगणे

स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविण्याच्या ईर्षेपोटी वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्याने ठाण्यातील एका युवतीचा मृत्यू झाला. तर आणखी एका घटनेत उत्तेजकांच्या सेवनामुळे शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू ची घटना

घातक उत्तेजक द्रव्य देणाऱ्या व्यायामशाळांवर होणार कारवाई -डॉ. राजेंद्र शिंगणे
SHARES

फिटनेससाठी जिममध्ये जाणे हे आजकालच्या तरुणाईसाठी सामान्य गोष्ट आहे. परंतु काही तरुण मुलं आपलं शरीर अधिक पिळदार आणि आकर्षक बनवण्यासाठी घातक उत्तेजक द्रव्य घेत असल्याचे निदर्शनास आले. मूळात हे द्रव्य त्यांना व्यायाम शाळेतच उपलब्ध होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुंब्रात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा अशा उत्तेजक द्रव्याच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. याबाबत विधानसभेत अमित साटम, आशीष शेलार, कॅप्टन आर. तमिल सेल्वन आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना डाॅ. शिंगणे यांनी अशा व्यायाम शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

हेही वाचाः-भाऊचा धक्का ते मांडवा 'रो पॅक्स फेरी' सेवा लवकरच होणार सुरु पिळदार शरीर मिळवण्यासाठी स्टेरॉईड, सप्लिमेंट व तत्सम गोष्टींचा केला जाणारा वापर तुमच्या शरीरासाठी हानिकारकही ठरू शकतो.अनेक जण वजन कमी-अधिक करण्यासाठी अशा उत्तेजक द्रव्यांचे सेवन करत असतात. या घातक द्रव्याच्या सेवनामुळे तरुणांमध्ये आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण ही मागील काही वर्षात वाढले आहे. विशेष म्हणजे ही घातक द्रव्ये त्यांना व्यायाम शाळेतूनच दिली जात असल्याचे वास्तव पुढे आले. राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविण्याच्या ईर्षेपोटी वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्याने ठाण्यातील एका युवतीचा मृत्यू झाला. तर आणखी एका घटनेत उत्तेजकांच्या सेवनामुळे शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू झाल्याची माहिती देत वजन कमी करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी व्यायामशाळांमध्ये देण्यात उत्तेजकांवर बंदी आणण्याची मागणी सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी केली.अमेरिकेतून उत्तेजकयुक्त पावडर मोठय़ा प्रमाणात राज्यात येत असून व्यायामशाळेत जाणारा तरुण वर्ग त्याचे सेवनही करीत आहे. त्यामुळे तरुण पिढीचे मोठे नुकसान होत असून या औषधांवर बंदी घाला तसेच याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

हेही वाचाः-जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा

कोणत्याही औषधावर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला असून दमा, त्वचेवरील आजार तसेच अन्य आजारांवरील उपचारांसाठी उत्तेजकांच्या प्रवर्गातील औषधे आवश्यक असल्याची माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली. व्यायामशाळेमध्ये अशा औषधांचा चुकीच्या कारणांसाठी वापर केला जात असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा