Advertisement

पायल घोषने केला आरपीआयमध्ये प्रवेश

दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष हिने सोमवारी रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंत प्रवेश केला.

पायल घोषने केला आरपीआयमध्ये प्रवेश
SHARES

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष हिने सोमवारी रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंत प्रवेश केला.

मुंबईतील रिपाइंच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत रामदास आठवले यांनी पायल घोष हिची पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याची घोषणा केली. पायल पक्षसंघटनेच्या वाढीचं काम करेल, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. (actress payal ghosh joins union minister ramdas athawale led RPI in mumbai)

पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करून त्याच्याविरोधात तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रामदास आठवले यांनी तिची भेट घेऊन तिला पाठिंबा दिला होता. एवढंच नाही, तर याप्रकरणी आठवले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यांची भेट घेऊन अनुराग कश्यपची चौकशी करून त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

पायलच्या जीवाला धोका असल्याचं सांगत तिला वाय दर्जाची सुरक्षा मिळावी, अशा मागणीचं निवेदन देखील आठवले यांनी राज्यपालांना दिलं होतं.

मागणी करूनही अजून अनुराग कश्यपवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तरीही आम्ही सर्वजण पायल घोषसोबत असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा