Advertisement

आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका - रवीना टंडनचं वादग्रस्त ट्विट


आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका - रवीना टंडनचं वादग्रस्त ट्विट
SHARES

राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलकांवर अभिनेत्री रवीना टंडनने टीका केली आहे. हमीभावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात टाका. इतकंच नव्हे तर त्यांना जामीनही मंजूर करू नका, असं रवीनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे. अनेकांनी रवीनाच्या या मतांशी सहमती दर्शवली असली तरी बहुतेक जणांनी रवीनावर टीका केली अाहे.


काय म्हणाली रवीना?

“ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची पद्धत भीषण आहे. सार्वजनिक मालमत्ता, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणं दुर्दैवी आहे. आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाका. त्यांना जामीनही मंजूर करू नका, असं ट्विट रवीनानं केलं अाहे.


 

रवीना ठरली टीकेची धनी

या वक्तव्यामुळे रवीनानं स्वत:वर रोष ओढवून घेतला आहे. रवीनाच्या या ट्विटचा अनेकांनी विरोध केला आहे. विरोधकांनाही रवीनाला प्रत्युत्तर देत आपलं म्हणणं बरोबर असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हमीभावाच्या मूळ मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे नुकसान होत असलं तरी ट्विटमध्ये वापरलेली भाषा चुकीची असल्याचा फटका रवीनाला सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना तुरुंगात टाका आणि जामीनही देऊ नका, ही रवीनाची भूमिका चुकीची असल्याचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे.


हेही वाचा -

रवीना टंडन आईच्या भूमिकेत

शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घ्या- शरद पवार

किसान संघर्ष समितीचं १० जूनला 'चक्का जाम' आंदोलन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा