Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

...म्हणून आदित्य ठाकरेंनी मानले जलोटांचे आभार

आम्ही प्रत्येकाची अशाचप्रकारे काळजी घेत असून परदेशातून महाराष्ट्रात परतणारा प्रत्येकजण सुरक्षित आहे

...म्हणून आदित्य ठाकरेंनी मानले जलोटांचे आभार
SHARES

प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांना लंडनमधून मुंबईत परतताच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून तिथे मुंबई महापालिकेकडून त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याने त्याबद्दल जलोटा यांनी आभार मानले आहेत. जलोटा यांनी पालिकेचे कौतुक केल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही जलोटा यांना धन्यवाद देत आम्ही प्रत्येकाची अशाचप्रकारे काळजी घेत असून परदेशातून महाराष्ट्रात परतणारा प्रत्येकजण सुरक्षित आहे, ही खात्री आम्ही या माध्यमातून देत आहोत, असे आदित्य यांनी स्पष्ट केले.

 हेही वाचाः- Coronavirus Updates: रेल्वे प्रवाशांचं स्क्रीनिंग करण्यासाठी राज्य सरकारची रेल्वेला विनंती

जगभरात कोरोना थैमान घातले असताना भारतातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंते वातावरण पसरले आहे. भारतात महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने चिंत अधिकच भर पडली आहे. या स्थितीशी सामना करण्यासाठी राज्य सरकार व स्थानिक स्वराज संस्था आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करत आहेत. त्याचाच भाग म्हणून परदेशात महाराष्ट्रात येत असलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे व त्या विलगीकरण कक्षात ठेवायचं की घरीच १४ दिवस वेगळे राहण्याची सूचना द्यायची? याचा निर्णय घेतला जात आहे.

 हेही वाचाः- Coronavirus: अतिरिक्त भाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर होणार कारवाई - अनिल परब

भजन गायक अनूप जलोटा यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. अनूप जलोटा नुकतेच युरोपमधून परतले होते. हॉलंड, जर्मनी, लेस्टर आणि लंडन अशा शहरांमध्ये त्यांचे कार्यक्रम घेतल्यानंतर अनूप जलोटा लंडनहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे चार वाजता पोहोचले. तिथून त्यांना थेट मिरज हॉटेलमध्ये नेण्यात आलं. कोरोना व्हायरसच्या जोखमीमुळे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा