Advertisement

'बाळराजें'च्या मित्रांना वाचवण्यासाठी कारवाईचा फार्स - विखे पाटलांचा आरोप


'बाळराजें'च्या मित्रांना वाचवण्यासाठी कारवाईचा फार्स - विखे पाटलांचा आरोप
SHARES

कमला मिल्स कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरू झालेली कारवाई हा केवळ फार्स आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सचे मालक हे ‘बाळराजें’चे जिवश्च कंठश्च मित्र आहेत. त्यांना या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचं निलंबन आणि बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तोंडदेखली कारवाई सुरू आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.


हॉटेल्सच्या मालकांचे धागेदोरे सेनेशी

‘मोजेस बिस्ट्रो’ व ‘वन अबोव्ह’ या दोन्ही हॉटेल्समध्ये बेकायदा व असुरक्षित बांधकाम झाल्याची पूर्ण माहिती महानगरपालिकेला होती. परंतु १४ निरपराध मुंबईकरांचे बळी जाईस्तोवर पालिका प्रशासनाने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केलं. या हॉटेल्सच्या मालकांचे धागेदोरे थेट भाजप आणि शिवसेनेच्या वजनदार नेत्यांशी जुळले असल्याची जाणीव महानगरपालिकेला होती. त्यामुळेच या हॉटेल्सविरुद्ध कारवाई झाली नाही, असं सांगून विरोधी पक्षनेत्यांनी मोजेस बिस्ट्रो या हॉटेलचा ऑगस्ट महिन्यातील तपासणी अहवाल सादर केला.


पहारेकऱ्यांनो जागे व्हा...

मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपने आता जागं झालं पाहिजे, असा टोला लगावत त्यांनी राज्याची सत्ता टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी करू नये. मुंबई महापालिकेत रूफ टॉपवर बसून नाईट लाईफच्या गप्पा करणाऱ्यांना आता जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.हेही वाचा-

एकाच दिवशी ३१४ अनधिकृत पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई; ७ हॉटेल केले सील

रविवारीही कारवाईचा धडाका, शहरभरातील बेकायदा बांधकामांवर महापालिकेचा हातोडा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा