Advertisement

मालाडमधील मैदानाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?

मालाडच्या मैदानाचे नाव टिपु सुलतान नव्हे तर झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

मालाडमधील मैदानाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?
SHARES

मालाडमधील मैदानाच्या नामकरणाचा वाद (Mumbai Tipu Sultan Ground controversy) पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

मालाडच्या मैदानाचे नाव टिपु सुलतान नव्हे तर झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान देण्याचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीत प्रस्ताव मंजूर झाला आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर अंमलबजावणी होणार आहे. समाजवादी पक्षाकडून या नव्या नामकरणाला विरोध होता.

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपले हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका महापुरुषाचे नाव काढण्यासाठी दुसऱ्या महापुरुषाचे नाव वापरले जात आहे. हे योग्य नाही, शिवसेनेने असे करणे योग्य नाही. झाशीची राणी यांचे नाव देण्याचा हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती महापौरांना पत्र देऊन झाशीची राणी यांचे नाव मोठ्या वास्तूला द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार , मुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पी नॉर्थ विभागातील नगरसेवकांनी या उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे नामकरण करण्याची मागणी केली. त्याबाबतचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीमध्ये मंजूर झाला. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर नामकरण केले जाणार आहे.

मालाड इथल्या कलेक्टरच्या मालकीच्या भूखंडावर उद्यान आहे. त्याचे सुशोभीकरण पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले. या उद्यानाला कित्तेक वर्षे टिपू सुलतान या नावानं ओळखलं जात असल्यानं उद्यानाच्या प्रवेशद्वारावर टिपू सुलतान उद्यान असे नाव लिहिण्यात आले.

टिपू सुलतान या नावावरून वाद होत असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी झाशीच्या राणीचे नाव उद्यानाला द्यावे अशी मागणी शिवसेनेची असल्याचं म्हटलं होतं.

पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार यांच्यांसह पी उत्तर विभागातील शिवसेना नगरसेवकांनी पत्र देत झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर बाजार व उद्यान समितीच्या सभेत झाशीची राणी लक्ष्मीबाई उद्यान असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.



हेही वाचा

नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर महाविकास आघाडी ठाम

वरळीतील 'या' मैदानाचा कायापालट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा