श्रेयवादावरून मित्रपक्षांमध्ये रंगला कलगीतुरा

बोरिवली (प.) - आयसी कॉलनीतल्या रस्ता उद्घाटनाच्या श्रेयावरून भाजपा-शिवसेना आमनेसामने उभे ठाकले आहेत. 5 जानेवरीला बोरिवलीच्या आयसी कॉलनीतील शुभजीवन चौक आणि मार्गाचे उद् घाटन केले जाणार होते. या वेळी एकीकडे श्रेय घेण्यासाठी भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी उद्घाटन केलं. तर दुसरीकडे त्याच रस्त्याचं उद्घाटन शिवसेनेच्या वतीनेही करण्यात आलं. हा रस्ता बिल्डरकडून बनवला जात आहे. मात्र त्याचं श्रेय घेण्यासाठी दोन पक्षांमध्ये चांगलीच जुंपलीय.

उत्तर मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे नेते अनेक ठिकाणी श्रेय घेण्यासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसा भाजपा आणि शिवसेनेत दुरावा वाढत असल्ल्याचे पहायला मिळत आहे.

Loading Comments