Advertisement

JNU Protest: दीपिकाने काहीही चुकीचं केलं नाही, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यावरुन सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यावर टीका करण्यात येत आहे.

JNU Protest: दीपिकाने काहीही चुकीचं केलं नाही, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
SHARES

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यावरुन सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दीपिकाने काहीही चुकीचं केलं नसल्याचं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. 

चव्हाण म्हणाले, जेएनयूमध्ये जे काही झालं त्याविरोधात तर देशातून अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दीपिकाने सहभागी होणं यामध्ये मला काहीही चुकीचं दिसत नाही.

हेही वाचा- JNU Protest: सोमय्यांच्या अंगात इंग्रजांचं रक्त, अबू आझमींचा टोला

आगामी चित्रपट ‘छपाक’च्या प्रमोशनसाठी दिल्लीत असलेल्या दीपिकाने मंगळवारी ‘जेएनयू’त जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी तिने जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष हिची देखील भेट घेतली. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली की, सद्यस्थितीत देशात जे काही चित्र आहे, ते पाहून दु:ख होतं. कुणी काहीही बोलणार आणि निसटून जाणार, याची सवय होऊ नये. हा आपल्या देशाचा पाया नक्कीच नाही. जे काही सुरू आहे त्याबद्दल प्रचंड राग आहे, पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे कुठलीही कारवाई केली जात नाही.  

या भेटीनंतर सोशल मीडियावर दीपिका चांगलीच ट्रोल काहीजणांनी तर तिच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत #boycottchhapaak हा हॅशटॅग सुरू केला. तर काहींनी #ISupportDeepika हॅशटॅग सुरू करत दीपिकाला पाठिंबा दर्शवला.

हेही वाचा- तर, मनसे-भाजप युती शक्य, मुनगंटीवार यांचं वक्तव्य

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा