Advertisement

एका व्यक्तीकडे एकच पद, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अशोक चव्हाण म्हणाले…

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांबाबत पाटील यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. एका व्यक्तीकडे एकच पद असावं की नाही याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

एका व्यक्तीकडे एकच पद, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अशोक चव्हाण म्हणाले…
SHARES

काँग्रेसच्या (congressमहाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात कायम राहणार की राजीनामा देणार यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण (ashok chavan) म्हणाले की, येत्या काळात ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी कशा रितीने पूर्वतयारी करावी, सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती काय आहे, या अनुषंगाने पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. आमदारांना त्यांच्या मतदारसंघासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर पाटील यांनी काही जणांची मते जाणून घेतली असून ते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या इतर आमदारांची देखील भेट घेणार आहेत. 

हेही वाचा- राजीनाम्याच्या चर्चांवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांबाबत पाटील यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. एका व्यक्तीकडे एकच पद असावं की नाही याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असं देखील अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राजीनाम्याच्या चर्चांवर मौन सोडताना बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी सांगितलं की, माझा दिल्ली दौरा आणि राजीनाम्याचा काहीही संबंध नाही. माझ्याकडे सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्रीपद अशा तीन जबाबदाऱ्या आहेत. या जबाबदाऱ्या सांभाळतानाच माझ्यावर पक्षाला आणखी काही जबाबदारी द्यायची असेल, तर माझी हरकत नाही, असं मी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांना सांगितलं होतं. एवढंच नाही तर माझ्याकडील जबाबदाऱ्यांचं विभाजन करायचं असल्यास त्यालाही माझी तयारी असेल, असं आधीच स्पष्ट केलं होतं. 

(ashok chavan clarifies on maharashtra congress president post)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा