‘ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी’

    मुंबई  -  

    मुंबई - महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना - भाजपामध्ये ‘सामना’ रंगला असताना आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रावर 16, 20 आणि 21 फेब्रुवारी या दिवशी बंदी घालावी अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दैनिक सामनातून आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न होतोय , त्यामुळे त्यावर योग्य ती कारवाई करावी असं पत्र भाजपाच्या प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई लाइव्ह’ने सामान्य वाचकांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळ्याच वाचकांनी ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी उद्या कोणताही पक्ष उठून कोणत्याही वृत्तपत्राविरोधात अशा प्रकारची मागणी करू शकतो, असा धोकाही या वाचकांनी व्यक्त केला आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.