Advertisement

शासकीय वसाहतीतून एकाही रहिवाशाला स्थलांतरीत होऊ देणार नाही- राज ठाकरे

शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी राज ठाकरे यांची शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी आपल्या व्यथा मांडत माफक दरात घरे मिळण्याबरोबरच शासकीय वसाहतीतून रहिवाशांना स्थलांतरीत होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानुसार राज यांनी या रहिवाशांच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहण्याचं आश्वासन दिल्याची माहिती वांद्रयाचे मनसे विभाग अध्यक्ष सुनील हर्षे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

शासकीय वसाहतीतून एकाही रहिवाशाला स्थलांतरीत होऊ देणार नाही- राज ठाकरे
SHARES

वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीतील रहिवासी कर्मचाऱ्यांना हुसकावून लावत ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचं म्हणत या परिसरातून एकाही रहिवाशाला स्थलांतरीत होऊ देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी राज यांची शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी आपल्या व्यथा मांडत माफक दरात घरे मिळण्याबरोबरच शासकीय वसाहतीतून रहिवाशांना स्थलांतरीत होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानुसार राज ठाकरे यांनी या रहिवाशांच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहण्याचं आश्वासन दिल्याची माहिती वांद्र्याचे मनसे विभाग अध्यक्ष सुनील हर्षे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


काय आहे प्रकरण?

वांद्रे पूर्वेकडे अंदाजे ९९ एकर जागेवर शासकीय वसाहत वसलेली असून या वसाहतीची पुरती दुरावस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे खरा, पण हा पुनर्विकास प्रत्यक्षात मात्र मार्गी लागताना दिसत नाही. एकीकडं पुनर्विकासाचं घोंगडं भिजतं असून दुसरीकडे या पुनर्विकासांतर्गत शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना माफक दरात घरं मिळावी, या रहिवाशांच्या मागणीकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे.


रहिवाशांना नोटीस

असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं इमारतींच्या दुरूस्तीच्या नावाखाली रहिवाशांना काही महिन्यांपासून नोटीस पाठवण्यास सुरूवात केली आहे. या नोटीशीनुसार रहिवाशांना कायमस्वरूपी घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा नोटीसा हातात पडल्यापासून शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. रहिवाशांनी स्थलांतरीत होण्यास नकार देत आता याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून रहिवाशांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.


राज ठाकरे मांडणार भूमिका

शासकीय वसाहतींचा पुनर्विकास आणि रहिवाशांना माफक दरात घरं मिळावीत याबाबतची पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे हे येत्या १ जुलैला राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत. वांद्रयातील कम्युनिटी हाॅल इथं यासंबंधी राज ठाकरे एक सभा घेणार असून या सभेत ही भूमिका ते मांडणार असल्याचंही हर्षे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

वांद्रे वसाहतीतील १६९३ सदनिकांना नोटिसा

धक्कादायक...वांद्रे सरकारी वसाहती धोकादायक घोषित, कर्मचारी हवालदील



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा