विद्यासागर राव यांना निरोप, कोश्यारी स्वीकारणार पदभार

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राज्य सरकारतर्फे त्यांना राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमाद्वारे निरोप देण्यात आला.

SHARE

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राज्य सरकारतर्फे त्यांना राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमाद्वारे निरोप देण्यात आला. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी गुरूवारी आपला पदभार स्वीकारतील. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन राव यांची आभार मानले. राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमानंतर राज्यपाल सपत्नीक हैदराबादकडे रवाना झाले.

हेही वाचा- भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, प्रधान सचिव राजशिष्टाचार नंदकुमार इ. उपस्थित होते.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. कोश्यारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता राज्यपाल पदाची शपथ घेतील.हेही वाचा-

साहेबांवर बोट दाखवणारे डबल ढोलकी- राेहीत पवार

७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मुंबई दौरासंबंधित विषय
ताज्या बातम्या