Advertisement

साहेबांवर बोट दाखवणारे डबल ढोलकी- राेहीत पवार

साहेबांच्या राजकारणावर बोट दाखवणारे डबल ढोलकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर केली आहे.

साहेबांवर बोट दाखवणारे डबल ढोलकी- राेहीत पवार
SHARES

गरज पडली की साहेबांचा सल्ला घ्यायचा, बारामतीत येऊन त्यांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ जवळ आल्यास साहेबांनी काय केलं असं विचारायचं? साहेबांच्या राजकारणावर बोट दाखवणारे डबल ढोलकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर केली आहे.

रोहीत यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून भाजपाने केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूरमधील सभेत शरद पवार यांच्या राजकारणावर टीका केली होती. तसंच मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपा किंवा शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामध्ये सचिन अहिर, मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडीक, दिलिप सोपल यांचा समावेश आहे. 

पक्ष सोडून जाणाऱ्या बहुतेक नेत्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीसाठी शरद पवार यांचे आभार मानत विकासासाठी पक्ष सोडत असल्याची कारणं दिली आहेत. या सगळ्यांवर रोहीत पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे भाष्य केलं आहे. 


काय म्हणाले रोहीत पवार?

डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत.

पण आत्ता बास झालं. साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते IT पार्क उभा करण्यापर्यन्तची हि शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.हेही वाचा-

भाजपाने दरवाजे उघडल्यास विरोधकांमध्ये पवारांशिवाय कुणीही उरणार नाही- शहा

अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागलेसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा