Advertisement

सामाजिक भान जपणारे भय्यूजी महाराज


सामाजिक भान जपणारे भय्यूजी महाराज
SHARES

राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेले भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी १२ जूनला दुपारी येथील आश्रमात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

उदयसिंह देशमुख (भय्यूजी महाराज) यांचा जन्म १९६८ साली शुजालपूरमध्ये झाला. त्यांचं बालपण आनंदात गेल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी १९९० च्या दशकात ‘सियाराम शर्ट्स’ च्या ब्रँडसाठी मॉडलिंगही केलं.  त्याशिवाय त्यांना घोडेस्वारी व तलवारबाजी करण्यात विशेष आवड होती. परंतू त्यातही त्यांना आवड न वाटल्यान ते अध्यात्माकडे वळले आणि थोड्याच कालावधीत ते अध्यात्मिक गुरू बनले.


महाराष्ट्रातही अनेक अनुयायी

२०११ मध्ये अण्णा हजारेचं आंदोलन मागे घेण्यात भय्यू महाराज यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. भय्यूजी महाराज अध्यात्मिक गुरू बनल्यानंतर मोठमोठे राजकीय नेते  उद्योगपती त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावू लागले. त्यानंतर त्यांचं राजकीय वर्तुळात वजन वाढू लागलं. फक्त इंदोरमध्येच नाही तर त्यांचे महाराष्ट्रातही त्यांचे अनेक अनुयायी आहेत.


मंत्रीपद नाकारलं

भय्यूजी महाराजांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या राजकारणात अनेकदा महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या शब्दाला सरकार दरबारी मान होता. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला होता. परंतू त्यांनी तो स्विकारला नव्हता.


सामाजिक क्षेत्रातही योगदान

भय्यूजी महाराजांनी राजकीय व अध्यात्मिक क्षेत्राशिवाय सामाजिक क्षेत्रातही काम केलं अाहे.  ते सदगुरू दत्त धार्मिक ट्रस्टचा कारभार पहायचे. या ट्रस्टमार्फत गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिल्या जात असत.  तसंच त्यांनी झाडं लावा, झाडं जगवा ही मोहिम सुरू केली होती. अनाथ, गरीब, एचआयव्ही बाधित मुलांसाठी त्यांनी विशेष निवासी शाळा सुरू केली. त्याशिवाय महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जलसंधारणाचं कामही त्यांनी केलं अाहे. 

दिवगंत नेते विलासराव देशमुख, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांसारख्या बड्या राजकीय नेत्यांचे ते निकटवर्तीय होते. वयाच्या ५० व्या वर्षी भय्यू महाराजांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. त्यांनी उचलेल्या या पावलामुळे सामाजिक, राजकीय, व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त करत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मत व्यक्त केलं आहे.



हेही वाचा -

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

संघाच्या मानहानीप्रकरणी राहुल गांधीवर आरोप निश्चित




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा