Advertisement

भिडे, एकबोटे यांना अटक करा! काँग्रेस, राष्ट्रवादीचं मंत्रालयासमोर आंदोलन


भिडे, एकबोटे यांना अटक करा! काँग्रेस, राष्ट्रवादीचं मंत्रालयासमोर आंदोलन
SHARES

दीड महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी भीमा कोरेगावच्या दंग्याची धग अजूनही शमलेली नाही. भीमा कोरेगावच्या दंगलप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे आणि हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काँग्रेस आणि राष्टवादीने आंदोलन केलं.


कुणी केलं आंदोलन?

मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मंत्रालयात वर्दळ असताना दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.



रास्ता रोकोचाही प्रयत्न

मुख्य प्रवेशद्वारावर सुमारे ५० कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंच्या विरोधात घोषणा दिल्या. या शिवाय काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही केला. वाहतुकीला अडथळा निर्माण होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.


काय केली मागणी?

विद्या चव्हाण आणि राजू वाघमारे यांनी थेट मंत्रालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं. भीमा कोरेगावच्या बंदमध्ये आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत तसेच भिडे आणि एकबोटे यांना त्वरित अटक करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. विद्या चव्हाण आणि राजू वाघमारे यांना मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला नेऊन नंतर सोडण्यात आलं.



हेही वाचा-

भीमा-कोरेगाव हिंसाचार: एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक, उच्च न्यायालयानं फेटाळला अटकपूर्व जामीन

भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा