भाजपाचा मुंबईकरांसोबत 'करार'नामा

Mumbai
भाजपाचा मुंबईकरांसोबत 'करार'नामा
भाजपाचा मुंबईकरांसोबत 'करार'नामा
भाजपाचा मुंबईकरांसोबत 'करार'नामा
भाजपाचा मुंबईकरांसोबत 'करार'नामा
भाजपाचा मुंबईकरांसोबत 'करार'नामा
See all
मुंबई  -  

दादर - पालिका निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. 2012 च्या निवडणुकीत युती होती त्यामुळे भाजपा-शिवसेनेचा जाहीरनामा एकच होता. मात्र या निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेना-भाजपाने आपले जाहीरनामे वेगवेगळे प्रसिद्ध केले. शिवसेनेने आपला वचननामा आधीच सादर केला होता. मात्र भाजपाने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपा कार्यालयातील वसंत स्मृती सभागृहात मुंबईकारांचा जाहीरनामा एका स्टॅम्प पेपरवर लिहून देणार भारतीय जनता पार्टी मुंबई आणि लिहून घेणार मुंबईकर नागरिक अशा पद्धतीचा 'हमी पारदर्शी कारभाराची विकासाला साथ मुंबईकरांची' या अाशयाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.

काय आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात -

 • मुंबईकरांना पाणी हक्क, मागेल त्याला पाणी

 • खड्डेमुक्त मुंबई होत नाही तोपर्यंत रस्ते दर, पथ दर आकारणार नाही

 • धूळमुक्त मुंबईसाठी मुंबईतील रस्ते पाण्याने धुणार, यासाठी मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरणार

 • सीवरेज कनेक्टिव्हिटी आहे त्याच भागांतील लोकांकडून सीवरेज टॅक्स घेणार

 • ई कचरा आणि डेब्रिज यासाठी विल्हेवाट केंद्र तयार करणार

 • 5 वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार

 • संयुक्त महाराष्ट्राचा धडा महापालिका शाळेत देणार, खऱ्या इतिहासाची माहिती देणार

 • 'राईट टू सर्व्हिस'प्रमाणे 'राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस' मुंबईकरांना देणार

 • सोप्या पद्धतीने सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासकीय बदल करणार

 • मुंबईकरांना वचन - सर्व नगरसेवकांना, सर्व कंत्राटदार, अधिकारी यांना दरवर्षी त्यांच्या उत्पन्नाची घोषणा करावी लागणार, असा कायद्यात बदल करणार

 • जे कंत्राटदार दुय्यम दर्जाचं काम करतात, त्यांना साथ देणारे अधिकारी, नगरसेवक अशा सर्वांविरोधात संघटित गुन्हे दाखल करणार

 • बजेटमधील कामांबद्दलचे प्रस्ताव मंजूर, चालू की पूर्ण याबद्दल माहिती देणारे बुकलेट संपर्क क्रमांक माहितीसह दर 6 महिन्यांनी प्रकाशित करणार

 • करचोरीची माहिती देणाऱ्या नागरिकांचं नाव कुठेही जाहीर न करता कराच्या 10 टक्के निधी बक्षीस म्हणून देणार

 • सिटीझन्स चार्टर आम्ही तयार करत आहोत. मुंबई क्षेत्रासाठी प्रचलित कायद्यानुसार उपलोकायुक्त पद निर्माण करणार. यामुळे लोकांना अधिकाऱ्यांविरोधात थेट दाद मागता येणार

 • पालिका कार्यालयामध्ये अधिकारी भेटत नाहीत. तेव्हा अधिकाऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगचा वापर अनिर्वाय करणार

 • सत्तेत आलो तर पीपीपी मॉडेलच्या कामांचे पुनरावलोकन करणार. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार

 • मुंबईत 28 लाख नोंदणीकृत वाहने आहेत. एक लाख दशलक्ष लीटर पाणी गाड्या धुण्यासाठी वापरले जाते. यासाठी प्रकल्प उभारून प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरवणार

 • सिटीझन स्मार्ट हेल्थ कार्ड तयार करुन हेल्थ डाटा तयार करणार. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची बांधणी करणार. मोफत आरोग्य तपासणी करणार. 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण देणार

 • 12,800 हेक्टर मोकळ्या क्षेत्रासाठी मुंबईतल्या लोकांची मते विचारत घेऊन 'ओपन स्पेस पॉलिसी' तयार करणार

 • ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेणार. यावर काम करणार

 • येत्या वर्षभरात मुंबईतील सर्व उरलेल्या इमारतींना ऑक्युपेशन सर्टिफिकेट(भोगवटा प्रमाणपत्र) देणार

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.