Advertisement

जिंकून मुंबईतील 'या' आमदाराने केला विक्रम

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कोळंबकरांनी आतापर्यंत तीन वेळा पक्ष बदलले. मात्र दांडगा जनसंपर्क आणि कामाच्या जोरावर कोळंबकरांच्या मागे जनता कायम उभी राहली.

जिंकून मुंबईतील 'या' आमदाराने केला विक्रम
SHARES

मुंबईतील टाॅप टेन अटीतटीच्या लढतीत वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आठव्यांदा विजय मिळवत विक्रम केला आहे. मुंबईतून आठ वेळा निवडून जाणारे ते एकमेव आमदार आहेत. मुंबईतील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून ते विधानसभेत जाणार आहेत. २६ हजारहून अधिक मतांनी कोळंबकर यांनी काँग्रेसचे उमेदवार शिवकुमार लाड यांचा पराभव केला.

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कोळंबकरांनी आतापर्यंत तीन वेळा पक्ष बदलले. मात्र दांडगा जनसंपर्क आणि कामाच्या जोरावर कोळंबकरांच्या मागे जनता कायम उभी राहली. १९९० ते २००४ या काळात ते शिवसेनेच्या तिकीटावर सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात कोळंबकर हे राज्यमंत्री होते.  मात्र २००४ मध्ये नारायण राणे शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर कोळंबकर सुद्धा काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसच्या तिकीटावर कोळंबकर तीनदा विधानसभेवर निवडून गेले.  २०१४ ची निवडणूक वगळता कोळंबकर या मतदारसंघातून निवडून येत होते.

२०१४ मध्ये मोदी लाटेत कोळंबकर अवघ्या ७०० मतांनी निवडून आले. मात्र वेळीच मतदारांचा कल पाहून कोळंबकरांनी निवडणूकीपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचा हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसैनिक नाराज होते. मात्र पडद्याआडच्या राजकारणात कोळंबकरांनी बाजी मारत काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांचा २६ हजारहून अधिक मतांनी पराभव केला.

 मुंबईतून आठव्यांदा विजयी होऊन विधानसभेत जाणारे ते एकमेव आमदार आहेत. मुख्यमंत्र्याच्या मर्जीतले असल्याने मंत्रीपदाची माळ कोळंबकरांच्या गळ्यात पडू शकते. तूर्तास तरी कोळंबकरांच्या मदतीने भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भक्कम पाय रोवल्याचे दिसून येते.



हेही वाचा -

मुंबईतील 'हे' आहेत विजयी उमेदवार

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही : शरद पवार




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा