आरपीआयला दिलेल्या जागेवर भाजपाच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचा विजयी

  Mumbai
  आरपीआयला दिलेल्या जागेवर भाजपाच्या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचा विजयी
  मुंबई  -  

  मुंबई - भाजपा जरी 82 जागा असल्याचा दावा करत असला तरी तांत्रिकदृष्ट्या भाजपाकडे सध्या 81 जागा आहेत. कारण भाजपाने मुंबईतील 25 जागा आरपीआयला (आठवले गट) सोडल्या होत्या. यातील सहा जागांवर भाजपाचे सुद्धा उमेदवार उभे होते. मात्र या भाजपाच्या उमेदवारांनी आपला प्रचार चालूच ठेवला होता. भाजपाने या सहा जागांवर आरपीआयच्या उमेदवारांना अधिकृतपणे पत्र देऊन पाठिंबा दिला होता. मात्र याच प्रभागामधून उभे राहिलेले भाजपाचे उमेदवार कमळ चिन्ह घेऊन प्रचार करत होते. 

  या सहा उमेदवारांना भाजपाने निलंबित केले नव्हते. त्यामुळे आरपीआयचे सहा उमेदवार गॅसवर आहेत अशी बातमी 'मुंबई लाईव्ह'ने दिली होती. त्याचाच प्रत्यय आता आला आहे. कारण प्रभाग क्रमांक 152 मध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील बनसोडे होते. असं असतानाही भाजपाच्या अनधिकृत उमेदवार आशा मराठे यांनी प्रचार कमळ या चिन्हासह सुरुच ठेवला होता. इतकेच नव्हे तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपाच्या अनधिकृत उमेदवार असलेल्या आशा मराठे यांचा प्रचार केला होता. वोटींग मशीनवर सुनील बनसोडे यांची निशाणी मेणबत्ती होती तर आशा मराठे यांची निशाणी कमळ होती त्यामुळे भाजपासोबत केलेल्या युतीच्या फायद्यापेक्षा नुकसान झाले आणि आशा मराठे कमळ या चिन्हाच्या मदतीने निवडून आल्या. चेंबूर भागामध्ये भाजपाने आरपीआयचा घात केला अशीच चर्चा सध्या सुरु आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.