अमित शहा बुधवारी मुंबई दौऱ्यावर

अमित शहा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच राज्यातल्या सत्तास्थापने संदर्भातलं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

SHARE

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या म्हणजेच बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये अमित शहा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच राज्यातल्या सत्तास्थापनेसंदर्भातलं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

चर्चेतून निघणार मार्ग

शिवसेनेनं सत्तेत समान वाटा मागितला आहे. तसंच सत्तेत अधिक कॅबिनेट मंत्रीपद द्यावेत आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मोकळीक द्यावी, अशा मागण्या शिवसेनेकडून करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून शुक्रवारी चर्चा केली. यावेळी दोघांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. दिवाळीनंतर भेटून सखोल चर्चा करू असंही ठरवण्यात आलं. त्यानुसार सत्तेतील वाटाघाटीबाबात उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये बुधवारी सखोल चर्चा होणार आहे.

पण शिवसेनेच्या आमदारांना काय वाटतं? हे वाचा

आमदारांची बंडखोरी

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा,  मीरा भाईंदरमधून निवडून आलेल्या गीता जैन आणि बार्शीमधून निवडून आलेले राजेंद्र राऊत या आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पत्र पाठवलं. तर गीता जैन यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. गीता जैन यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती. शिवसेनेच्या दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून आले आहेत. दरम्यान, आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहेहेही वाचा

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं - देवेंद्र फडणवीस

सत्तास्थापनेचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंच्या हाती- संजय राऊत


संबंधित विषय
ताज्या बातम्या