Advertisement

दहावीच्या परीक्षांबाबत अजूनही गोंधळ का?, भाजपचा शिक्षणमंत्र्यांना प्रश्न

राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांवर अद्याप कुठलाही निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न विचारत भाजपने शिक्षणमंत्र्यांवर टीका केली आहे.

दहावीच्या परीक्षांबाबत अजूनही गोंधळ का?, भाजपचा शिक्षणमंत्र्यांना प्रश्न
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) ने देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. असं असताना राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांवर अद्याप कुठलाही निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न विचारत भाजपने शिक्षणमंत्र्यांवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्यातील मेडिकलच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मग दहावीच्या परीक्षांबाबत अजूनही गोंधळ माजवून का ठेवला आहे? वर्षा गायकवाड तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहात ? असा प्रश्न भाजपने विचारला आहे. 

राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या, तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा विचार नाही, असं वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

हेही वाचा- राज्यातील SSC, HSC च्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षा जून महिन्यात, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी जाहीर केला आहे. 

तर, दुसरीकडे सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना आॅब्जेक्टिव्ह क्रायटेरियावर आधारीत गुणपत्रिका देण्यात येणार आहे. सीबीएसई दहावीची परीक्षा ४ मे ते १४ जून २०२१ या कालावधीत होणार होती. गुणपत्रिकांवर समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित केली जाईल.

तर, २ वीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण मंडळाकडून १ जून रोजी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर परीक्षा घेण्याचं निश्चित झाल्यावर विद्यार्थ्यांना किमान १५ दिवस आधी त्याबाबतची नोटीस काढून कळवण्यात येईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री डाॅ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितलं आहे.

(bjp criticised maharashtra education minister varsha gaikwad on ssc exams during covid19 pandemic)

हेही वाचा- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा