Advertisement

Ganesh Chaturthi 2020: गणेशभक्त-राजाची ताटातूट नको, आशिष शेलारांची ‘लालबागचा राजा’ला विनंती

लहान मूर्ती बसवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून आदर्श निर्माण करावा, अशी विनंती भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला केली केली आहे.

Ganesh Chaturthi 2020: गणेशभक्त-राजाची ताटातूट नको, आशिष शेलारांची ‘लालबागचा राजा’ला विनंती
SHARES

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्याऐवजी ११ दिवसांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहेच. परंतु मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये, त्याऐवजी मंडळाने लहान मूर्ती बसवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून आदर्श निर्माण करावा, अशी विनंती भाजप नेते आमदार आशिष शेलार (bjp leader ashish shelar demands lalbaugcha raja to celebrate ganesh chaturthi 2020) यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला केली केली आहे.

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता यंदाचा उत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे असंख्य गणेशभक्तांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सुरू असलेली परंपरा मंडळाने खंडीत करू नये अशी विनंती मंडळाने अनेक मान्यवरांकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा -लालबागचा राजा जनतेसाठी आदर्श, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मंडळाचं कौतुक

त्यावर आशिष शेलार यांनी देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय..पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मूर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवण्याचं ठरवलं आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुकच.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”.. पण मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ”

संकट मोठं आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचं ऑनलाइन दर्शनसुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकतं! या देशात श्रद्धेला मोल नाही..श्रद्धा तोलूनही पाहता येत नाही...म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

तत्पूर्वी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती या सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मध्यवर्ती संघटनेने ‘लालबागचा राजा’ला एक विनंतीचं पत्र पाठवत गणेशोत्सवाची परंपरा खंडीत करू नये अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ४ फुटांपर्यंत गणेशमूर्तीची उंची ठेवून ‘लालबागचा राजा’ मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी व यंदा भाविकांसाठी केवळ लाइव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी समन्वय समितीची इच्छा आहे. हजारो मंडळांनी भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून यंदा साधेपणाने का हाईना परंपरा खंडीत न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागचा राजा मंडळाच्या निर्णयाला समन्वय समितीचा विरोध नाही. मात्र परंपरा अखंडित ठेवता येईल यासाठी काहीतरी सुवर्णमध्य काढवा, असं मत या पत्रात समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी नोंदवलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा