ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी नाही, चंद्रकांत बावनकुळे यांचा खुलासा

भाजपमधील सगळेच ओबीसी नेते नाराज आहेत, असं म्हणणं चुकीचं असल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप खोडून काढलं आहे.

SHARE

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी जाहीर व्यासपीठावरून केलेला असताना भाजपमधील ओबीसी नेत्यांपैकीच एक असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हे आरोप खोडून काढले आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही, तर हा पराभव जाणीवपूर्वक घडवून आणला आहे. असा खळबळजन आरोप एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला. परळीतील गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आरोप केले. त्याआधी तिकीट नाकारण्यात आलेले तसंच निवडणुकीत पराभूत झालेले नेते दुर्दैवाने ओबीसी असल्याचं खडसे म्हणाले होते. 

हेही वाचा- उठसूठ पक्षशिस्त मोडू नका, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

तर पंकजा मुंडे यांनीही हा माझ्या बापाचा पक्ष आहे. मी बंडखोरी करत पक्ष सोडणार नाही. परंतु पक्षाला हवं असेल तर मला काढून टाकावं, असं म्हणत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिलं आहे. शिवाय राज्यभर दौरे काढण्याचंही मुंडे यांनी ठरवलं असल्याने त्या पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आणू शकतात. हे दोन्हीही नेते ओबीसी असल्याने भाजपात ओबीसी नेत्यांना डावलण्यात येत असल्याचं चित्र त्यांच्या समर्थकांमध्ये तयार होत आहे. 

मात्र भाजपमधील सगळेच ओबीसी नेते नाराज आहेत, असं म्हणणं चुकीचं असल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप खोडून काढलं आहे. पक्ष सत्तेत नसल्याने पक्षांतर्गत जातीय राजकारण सुरू झालं आहे. परंतु जातीपातीने माणसं मोठी होत नाहीत, तर कर्तृत्वाने मोठी होतात, असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं.

हेही वाचा- हवं तर मला पक्षातून काढा, पंकजा मुंडेंचं पक्षनेतृत्वालाच आव्हान

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचंही तिकीट कापण्यात आलं होतं. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या