Advertisement

तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार नाही, तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठंही जाणार नाही, असा खुलासा फडणवीस यांनी केला.

तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस
SHARES

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार (maha vikas aghadi) स्थिरस्थावर झाल्याने आता शिवसेना भाजपसोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना दिल्लीत बोलवण्यात येईल, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार नाही, तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठंही जाणार नाही, असा खुलासा फडणवीस यांनी केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. 

हेही वाचा- फडणवीस दिल्लीला गेले, तर फायदाच- एकनाथ खडसे

ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे. त्यामुळे ते फार काळ टीकणार नाही. आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. मात्र हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे. शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं आहे. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत. एवढ्या लवकर सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका, अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (maha vikas aghadi) निशाणा साधला.

 

आपल्या दिल्लीवारीबद्दल ते म्हणाले, मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार आल्याशिवाय दिल्लीवारी करणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (delhi vidhan sabha election) प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) तब्बल ८ दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. 

हेही वाचा- आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे

राज्यात शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करणं शक्य नसल्याने देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना राज्यसभेवर निवडून आणून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावं किंवा संघटना पातळीवर महत्त्वपूर्व जबाबदारी द्यावी, असा भाजपचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी (pm narendra modi) आणि अमित शहा (amit shah) यांच्या जवळचे मानले जातात. अरूण जेटली, मनोहर पर्रिकर आणि सुषमा स्वराज या मोठ्या नेत्यांच्या निधनानंतर सध्या केंद्र सरकारमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा