Advertisement

University Exams 2020: विद्यापीठ परीक्षांचा पोरखेळ नको, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

अंतिम वर्षांच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या हिताचा विषय आहे. या विषयाचा पोरखेळ करू नये, असं म्हणत भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला हाणला.

University Exams 2020: विद्यापीठ परीक्षांचा पोरखेळ नको, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
SHARES

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा हा यूजीसीने अहंकाराचा मुद्दा करू नये, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं, अशी विनंती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यूजीसीला उद्देशून केली होती. त्यावर अंतिम वर्षांच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या हिताचा विषय आहे. या विषयाचा पोरखेळ करू नये, असं म्हणत भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला (bjp leader devendra fadnavis slams tourism minister aaditya thackeray over university final year exams) हाणला.

परीक्षा होणारच

कोरोना संकटाकडे पाहता महाराष्ट्र सरकारने विद्यापीठांच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC) च्या गाईडलाइन्स सर्व विद्यापीठांसाठी बंधनकारक असल्याचं म्हणत यूजीसीने विद्यापीठांना सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचं यूजीसीने सोमवारी स्पष्ट केलं. ऑनलाइन, ऑफलाइन किंवा सामाईक पद्धतीने परीक्षा घेण्याची सूचना आयोगाने विद्यापीठांना केली आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांसदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंतिम वर्षांच्या परीक्षा हा राजकीय अहंकाराचा विषय होऊ शकत नाही. तो विद्यार्थ्यांच्या हिताचा विषय आहे. मूल्यांकनाची पद्धत अजून ठरत नसेल तर काय म्हणावं? माझी एकच विनंती आहे की, या विषयाचा पोरखेळ करू नये.

हेही वाचा- हा अहंकाराचा मुद्दा बनवू नका, परीक्षा घेण्यावरून आदित्य ठाकरेंची यूजीसीवर टीका

आराेग्य धोक्यात

कोरोनाच्या संकटातही परीक्षा घेण्याचा केंद्र सरकारच्या मनुष्यबळविकास मंत्रालय आणि यूजीसीचा निर्णय पूर्णपणे हास्यास्पद आणि वेगळ्या जगातला वाटतो. या निर्णयामुळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, त्यामुळे यूजीसीने हा अहंकाराचा मुद्दा बनवू नये, अशी माझी विनंती आहे, असं यासंदर्भात भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

अनाकलनीय निर्णय

भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना मनुष्यबळविकास मंत्रालय आणि यूजीसी असा निर्णयच कसा घेऊ शकतं, हेच अनाकलनीय आहे. किंवा परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची जबाबदारी मनुष्यबळविकास मंत्रालय आणि यूजीसीने घ्यावी. एका बाजूला जगातील सर्वोत्तम विद्यापीठं विद्यार्थी आणि शिक्षकांना सतावणारा ताणतणाव, अपूर्ण अभ्यासक्रम आणि आराेग्याबाबतचा मोठा धोका यामुळे परीक्षा रद्द करत असताना आपल्याकडील मनुष्यबळविकास मंत्रालय आणि यूजीसी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहेत. एचआरडी आणि यूजीसी वगळता जगात इतरत्र कुठंही शैक्षणिक श्रेष्ठता ही एका परीक्षेवर अवलंबून नसते, हे कुणाला सांगण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- यूजीसीच्या सूचनेनुसार परीक्षा घ्याव्याच लागतील!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा