Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

हे सरकार नाही, सर्कस आहे- नितेश राणे

पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचा निर्णय अवघ्या २ दिवसांत रद्द करण्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारमधील गोंधळ पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे.

हे सरकार नाही, सर्कस आहे- नितेश राणे
SHARES

पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचा निर्णय अवघ्या २ दिवसांत रद्द करण्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारमधील गोंधळ पुन्हा एकदा सर्वांसमोर (bjp leader mla nitesh rane counter maha vikas aghadi government over cancel transfer of dcp) आला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी हे सरकार नाही, सर्कस आहे, असं म्हणत टोमणा मारला आहे.

शिवाय पोलिसांकडे आस्थापना मंडळ असतं. ते मंडळ बदल्या ठरवीत असतात. समन्वयाचा अभाव तर आहेच. पण विश्वासाचासुद्धा मोठा अभाव दिसतो आहे, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडी सरकारविरोधात तोंडसुख घेतलं. 

रद्द झालेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या मुद्द्याला हात घालताना आपल्या ट्विटर हँडलवरून नितेश राणे म्हणतात, नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे, तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते?? मात्र काँग्रेसच्या महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरच सरकार नाही CIRCUS आहे!! अशा शब्दांत नितेश राणे महाविकास आघाडीचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - सरकारचा प्रशासकीय गोंधळ सुरूच, IPS आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक आयपीएस आणि एसपीएस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपलेला होता. मात्र कोरोनामुळे हे अधिकारी आपापल्या पदांवर कार्यरत होते. परंतु २ जुलै रोजी मुंबईतील १२ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश राज्य शासनाकडून जारी करण्यात आले. सह पोलीस आयुक्त नवल बजाज यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले होते. परंतु अवघ्या २ दिवसांत नवल बजाज यांनी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे घेतले आहे. यामुळे केवळ पोलीस दलातच नव्हे, तर राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलं आहे.

पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश हे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने परस्पर देण्यात आले. त्याची कुठलीही कल्पना गृहमंत्र्यांना नव्हती. जोपर्यंत गृहमंत्र्यांना याबाबत माहिती देण्यात आली, तोपर्यंत आदेश निघाले होते. त्यानंतर तात्काळ हे आदेश मागे घेण्यात आले, असं म्हटलं जात आहे. या चर्चांमध्ये तथ्य असो किंवा नाही, परंतु विरोधकांना पुन्हा एकदा टीका करण्याची आयती संधी महाविकास आघाडीकडून मिळाली आहे. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा