Advertisement

नारायण राणे यांना कोरोनाची लागण

ट्टिटमध्ये राणे यांनी म्हटलं की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे.

नारायण राणे यांना कोरोनाची लागण
SHARES

भाजपा नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नारायण राणे यांनी ट्टिट करून ही माहिती दिली.

ट्टिटमध्ये राणे यांनी म्हटलं की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.

लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी मतदारसंघात व जनतेमध्ये फिरत आहे. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यामुळंच लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  आतापर्यंत राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.



 हेही वाचा -  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरे आंदोलकांवरील आरोप मागे घेण्याचे निर्देश

चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा