Advertisement

आता, आमदारकीही भिकेत मिळाली, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

भिकमध्ये मिळालेल्या या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा, अशा शब्दांत निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.

आता, आमदारकीही भिकेत मिळाली, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
SHARES

कोरोनामुळे (coronavirus) निर्माण परिस्थिती पाहता विधानपरिषदेच्या निवडणुका होणार नाही अशी स्थिती असल्याने राज्यपाल नियुक्त दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपालांना (maharashtra governor) शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते निलेश राणे (bjp leader nilesh rane) यांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा हाणला आहे.

काय म्हणाले राणे ?

पक्ष वडिलांचा, मुख्यमंत्रीपद काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आणि आता आमदारकी राज्यपालाकडून… या माणसाचं स्वतः च काहीच नाही. महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वतः साठी नशीबवान आहेत, उद्धव ठाकरे. सगळं बसल्या बसल्या मिळालं. आता आमदारकीपण बसल्या ठिकाणी राज्यपालांनी दिली. भिकमध्ये मिळालेल्या या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा, अशा शब्दांत निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. 

हेही वाचा- आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

घटनात्मक पेच कसा?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवाजी पार्क वरील भव्यदिव्य सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले होते. ठाकरे मुख्यमंत्री झाले असले, तरी त्यांना घटनेच्या कलम १६४ (४) नुसार ६ महिन्यांत विधीमंडळाचा (विधानसभा किंवा विधान परिषद) (maharashtra legisletive assembly) सदस्य होणं बंधनकारक आहे. यानुसार त्यांना २७ मेपूर्वी सदस्य होणं आवश्यक आहे. तसं न झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. 

हा घटनात्मक पेच टाळण्यासाठी राज्यपाल नियुक्त दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

हेही वाचा-माझ्या घराची रेकी, माझी हत्या करण्याचंही ठरलंय, आव्हाडांच्या दाव्याने एकच खळबळ 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा