Free Kashmir चा अर्थ संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला Free Internet वाटला, निलेश राणेंची टीका

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

Free Kashmir चा अर्थ संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला Free Internet वाटला, निलेश राणेंची टीका
SHARES

दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका तरुणीनं हातात 'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरले होते. या पोस्टरवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधांमधून मुक्तता करा असा आहे. तसेच काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद करण्याच्या निर्बंधांमधून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी तरुणी पोस्टरद्वारे करत असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तर आदित्य ठाकरे यांनीही पोस्टर झळकवणाऱ्या मुलीचा उद्देश नेमका काय होता हे समजून घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं होतं.

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. ‘Free Kashmir’ चा अर्थ शिवसेनेच्या संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला ‘Free Internet’ वाटला. लोकांना मूर्ख समजता??? सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका. अख्या भारताला Free Kashmir चा अर्थ कळतो अशा शब्दात म्हणत निलेश राणे यांनी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटलं होतं की, आंदोलन नेमके कशासाठी? काश्मीर मुक्तीची घोषणा कशाला? मुंबईमध्ये अशाप्रकारचे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? हे फक्त मुख्यमंत्री कार्यालयापासून दोन किमीवर घडतेय? उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आळवला जातोय, तो खपवून घेणार का.  यावर फ्री काश्मीरचा अर्थ संबंधित व्यक्तीनं सांगितल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे. तिथे आणखीही काही प्रकारचे निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलक तरुणी करत असल्याचं माझ्या वाचनात आलं आहे, असं राऊत म्हणाले होते. हेही वाचा -

'किन्नर बोर्ड'साठी तृतीयपंथीयांचं अजितदादांना निवेदन

नाराज वडेट्टीवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
संबंधित विषय