Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

“५० टक्के मतंही न राखणाऱ्या महाविकास आघाडीचं भवितव्य काय?”

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या क्राॅस व्होटिंगवर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

“५० टक्के मतंही न राखणाऱ्या महाविकास आघाडीचं भवितव्य काय?”
SHARES

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपचे उमदेवार अमरिश पटेल यांनी काँग्रेस उमेदवार अभिजीत पाटील यांचा दणदणीत पराभव केला. अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपात, तर अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. या निवडणुकीत फोडण्यात आलेल्या मतांवर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान झालं होतं. या विभागात ९९ टक्के मतदान झालं होतं. त्यातून भाजपचे (bjp) अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. मतमोजणीमध्ये भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवारांची मत मिळाल्याचं स्पष्ट झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा- विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी सरासरी ६९.०८ टक्के मतदान

या निवडणुकीसाठी भाजपाच्या १९९, तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केलं होतं. यापैकी काँग्रेसच्या (congress) ५० हून अधिक आणि महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं पुढं आलं आहे. यामुळे एकट्या काँग्रेसचं संख्याबळ १५७ असतानाही अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतंच मिळाली. पाटील यांना साधी शंभरीही गाठता आली नाही. तर अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवलं. 

यावर प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर म्हणाले, धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था  मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्के ही मतं राखू शकली नाहीत. यावरून महाविकास आघाडीचं काय भविष्य राहील हे स्पष्ट होतंय, असं भाकीत देखील दरेकर यांनी वर्तवलं आहे. 

(bjp leader pravin darekar reacts over amrish patel victory in vidhan parishad bypoll against congress)

हेही वाचा- कायदा-सुव्यवस्था राखा, मायानगरी आपोआप निर्माण होईल, शिवसेनेचा योगींना टोला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा