Advertisement

दुसऱ्यांना धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नाही; उद्धव यांचा शरद पवारांना टोला

बुधवारी सुजय यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण आपल्या मुलाबरोबर इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवत असल्याचं म्हणत अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना टोला लगावला.

दुसऱ्यांना धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नाही; उद्धव यांचा शरद पवारांना टोला
SHARES

सुजय विखे-पाटील यांच्या भाजपातील प्रवेशादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण केवळ आपल्याच मुलांचे लाड पुरवत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बुधवारी सुजय यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण आपल्या मुलाबरोबर इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवत असल्याचं म्हणत अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना टोला लगावला.


काय म्हणाले उद्धव ?

मी आपल्या मुलाबरोबर इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो. इतरांच्याही पोरांचा विचार करतो. दुसऱ्यांच्या पोरांना धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. या गोष्टींमुळे शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून सुजय यांना दगाफटका होणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.


जे बोलतो ते करतो

शरद पवार हे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. पण ते भविष्य कधीपासून सांगायला लागले याबद्दल कल्पना नाही. ते जे बोलतात त्याच्याविरूद्ध करतात, असं उद्धव यावेळी म्हणाले. परंतु आम्ही जे बोलतो तेच करून दाखलतो, असंही त्यांनी सांगितलं. 


आदित्यवर बंधन नाही

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर कोणतंही बंधन घातलं नव्हतं. तसंच मी देखील आदित्यवर निवडणूक लढवण्यासाठी कोणतंही बंधन घालणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत खुद्द आदित्य आणि शिवसैनिक निर्णय घेतील. तसंच यावेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं म्हटलं. तसंच येत्या एक-दोन दिवसांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले.




हेही वाचा -

शिवसैनिकांना खूश करण्यासाठी महामंडळांच्या पदांचं आमिष?

एमआयएमचे आमदार वारिस पठाण लढवणार लोकसभा निवडणूक?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा