शिवसैनिकांना खूश करण्यासाठी महामंडळांच्या पदांचं आमिष?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी पदांचं खैरात वाटण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांना महामंडळाची अध्यक्षपदं, उपाध्यक्षपदं आणि काहींना सदस्यपदं देण्यात आली आहेत.

SHARE

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पदांची खैरात वाटण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीनुसार शिवसेनेच्या अनेक नेत्यांना महामंडळाची अध्यक्षपदं, उपाध्यक्षपदं आणि काहींना सदस्यपदं देण्यात आली आहेत.


जालनाकरांनाही पदं

जालन्यातील दानवे-खोतकर समर्थकांमधला वाद शमवण्यासाठी त्या ठिकाणच्याही शिवसैनिकांना महामंडळाची पद बहाल करण्यात आली आहेत. शिवसेनेचे बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्यपदी, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांची गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला राज्यमंत्रीपदाचाही दर्जा आहे.

तर नव्या नियुक्त्यांमध्ये महिलावर्गालाही खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सविता किवंडे यांची महात्मा फुले विकास मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शिवसेनेचे उपनेते असलेले लक्ष्मण वडले यांची महाराष्ट्र अग्रीकल्चर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंटच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात झाली आहे.

याव्यतिरिक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई स्लम इम्प्रुव्हमेंट बोर्ड, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, म्हाडा अमरावती, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, एमएसआरडीसी, चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक पर्यटन महामंडळ, एमटीडीसी, एमआयडीसी यांसह अनेक महामंडळवरील नेमणुका जाहीर करत शिवसैनिकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.




हेही वाचा - 

कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर फुटणार युतीच्या प्रचाराचा नारळ

'अशी' असेल राज्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया



संबंधित विषय
ताज्या बातम्या