Advertisement

तर राष्ट्रवादीला २०, काँग्रेसला १० जागा मिळाल्या असत्या- चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते, तर राज्यात राष्ट्रवादीला २० आणि काँग्रेसला १० जागा मिळाल्या असत्या, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिउत्तर दिलं.

तर राष्ट्रवादीला २०, काँग्रेसला १० जागा मिळाल्या असत्या- चंद्रकांत पाटील
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते, तर राज्यात राष्ट्रवादीला २० आणि काँग्रेसला १० जागा मिळाल्या असत्या, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिउत्तर दिलं. शिवसेना सोबत नसती, तर भाजपाच्या ५० जागा निवडून आल्या असत्या, असं पवार म्हणाले होते. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढूनही ९८ जागा आल्या, तर भाजपच्या एकट्याच्याच १०५ निवडून आल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर वेगवेगळे लढले असते, तर राष्ट्रवादीच्या २० आणि काँग्रेसच्या १० जागा निवडून आल्या असत्या. (bjp maharashtra president chandrakant patil replies ncp chief sharad pawar over vidhan sabha seats and alliance with shiv sena

हेही वाचा - Sharad Pawar Interview: पुढच्या निवडणुका निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार

कार्यकर्त्यांना धीर

एका बाजूला शरद पवार महाविकास आघाडीचं सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं म्हणत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदार, कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते खासदार संजय राऊत सरकार पाडून दाखवा, असं आव्हान विरोधकांना देत आहेत. पण सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचं मोठं योगदान

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी भाजपने जिंकलेल्या जागांवर भाष्य केलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले होते, त्यात शिवसेनेचं फार मोठं योगदान होतं. शिवसेना भाजपसोबत नसती तर १०५ ऐवजी भाजपचे अवघे ४० ते ५० आमदार निवडून आले असते. 

गप्प करण्याची भूमिका

भाजपला १०५ पर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेनेनंच केलं होतं. परंतु निकालानंतर शिवसेनेला गृहीत धरण्याची भूमिका भाजपनं घेतली. त्याआधीच्या ५ वर्षात भाजपनं शिवसेनेला जवळपास बाजूला सारलं होतं. शिवसेनेला गप्प कसं करता येईल हेच पाहिलं होतं. त्यामुळं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतरांनी वेगळं काही करण्याची आवश्यकताच नव्हती, असा टोला शरद पवार यांनी हाणला होता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा