Advertisement

आमदार अमित साटम शिव्या प्रकरणावर पालिकेत घमासान!

विरोधी पक्षनेते रावीराजा यांनी या प्रकाराचा निषेध केला. 'ज्या शिव्या त्यांनी घातल्या त्याचा उल्लेखही आपण करू शकत नाही. त्यामुळे जो आमदार अशा शिव्या देऊन आपल्या अधिकाऱ्यांना धमकावत असेल, त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल, अशा आमदाराविरोधात एफआयआर दाखल करावा', अशी मागणी राजा यांनी केली.

आमदार अमित साटम शिव्या प्रकरणावर पालिकेत घमासान!
SHARES

भाजपा आमदार अमित साटम यांनी महापालिका अभियंत्यांना केलेल्या शिवीगाळाबद्दल महापालिका सभागृहात तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते रावीराजा यांनी साटम यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. याला भाजपाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपात जोरदार घोषणाबाजी झाली. विरोधी पक्षनेते रावीराजा यांनी अमित साटम यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.


'साटम यांच्याविरोधात एफआयआर करा'

विरोधी पक्षनेते रावीराजा यांनी या प्रकाराचा निषेध केला. 'ज्या शिव्या त्यांनी घातल्या त्याचा उल्लेखही आपण करू शकत नाही. त्यामुळे जो आमदार अशा शिव्या देऊन आपल्या अधिकाऱ्यांना धमकावत असेल, त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल, अशा आमदाराविरोधात  एफआयआर दाखल करावा', अशी मागणी राजा यांनी केली.


 


'आमदाराला सत्तेची गुर्मी आली आहे'

यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी याला हरकत घेत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्या नगरसेवकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. परंतु रवी राजा यांनी आपला मुद्दा पुढे रेटला. महापालिकेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. पण आईवरून शिव्या देत अमित साटम यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. 'सत्तेची गुर्मी आली आहे या आमदाराला, त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,' असेही रवी राजा यांनी सांगितले.


'नगरसेवकांची कामं झाली तर आमदारांना राग'

'अमित साटम यांनी ५० हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढला. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी 'विभागात नगरसेवक म्हणून काम करताना आमदार आणि खासदार यांच्याबरोबर चढाओढ असते. त्यामुळे नगरसेवक यांची कामे झाली, तर आमदार आणि खासदार यांना राग येतो आणि मग ते अशा प्रकारे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत राग व्यक्त करतात', असे सांगितले. दरम्यान, महापौरांनी हरकतीचा मुद्दा ग्राह्य न धरता तो फेटाळून लावला.



हेही वाचा

बदनामीसाठी खोटी शिवीगाळ, अमित साटम यांचं पोलिस आयुक्तांना पत्र

आ. अमित साटम यांची जुहूत फेरीवाल्यांना मारहाण, पोलिसांनाही शिवीगाळ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा