Advertisement

परिवहनमंत्री अनिल परब यांना अटक का नाही?

एस.टी. चे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारमधील परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांना अटक का नाही?
SHARES

जळगावमधील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ठाकरे सरकारला आत्महत्येसाठी जबाबदार धरल्याने राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना अटक का करण्यात येत नाही? असा प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी उपस्थित केला आहे.

जर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक होऊ शकते, तर एस.टी. चे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारमधील परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनाही जबाबदार धरावं, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दिवाळी सण तोंडावर असताना एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमिततेला कंटाळून जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एसटी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येला एसटी महामंडळाची कार्यपद्धती आणि ठाकरे सरकारला दोषी ठरवलं आहे. 

‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी विमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असं मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

(bjp mla atul bhatkhalkar demand to arrest maharashtra transport minister anil parab in st bus conductor suicide case)


हेही वाचा-

‘या’ आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?- देवेंद्र फडणवीस


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा