होऊ दे दोन-दोन हात, भाजप २०१९ साठी तयार- आशिष शेलार


SHARE

शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल, तर २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा शिवसेनेशी दोन हात करायला तयार आहे, असं म्हणत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आषिश शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला. हा ठराव कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमताने मंजूर केला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी पक्षाची भूमिका मांडली. भाजपसह महाराष्ट्राची जनता रस्ताही तयार असून यातून शिवसेनेचीच नुकसान होईल असे ते म्हणाले.


सरकार ५ वर्षे पूर्ण करणार- मुख्यमंत्री

शिवसेना सुरूवातीपासून आमच्यासोबत सत्तेत आहे. तेव्हापासून सत्तेत राहून शिवसेना सरकारविरोधी विधानं करत आहेत. कुणी काहीही बोललं तरी आम्ही आमचं सरकार ५ वर्षे पूर्ण करणार एवढं नक्की, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसवरून दिली.हेही वाचा-

शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागचे हात शिवसैनिक तोडल्याशिवाय राहणार नाहीत-उद्धव ठाकरे


संबंधित विषय
ताज्या बातम्या