Advertisement

संक्रांतीनंतर युतीचं गोडगोड बोला


संक्रांतीनंतर युतीचं गोडगोड बोला
SHARES

मुंबई - शिवसेना आणि भाजपामध्ये युतीबाबतची बैठक आता 15 जानेवारीनंतर होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपाकडून युतीबाबतचा प्रस्ताव शनिवारी शिवसेनेकडे आला आहे अशीही माहिती आहे. मात्र मकर संक्रात असल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये अद्याप युतीसाठी चर्चा सुरु झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपाला किती जास्त जागा हव्यात यावरच आता युतीचे भवितव्य अवलंबून आहे. मुंबईमध्ये भाजपाचे एकूण 18 आमदार आहेत, तर शिवसेनेचे 13 आमदार आहेत तसेच मुंबईत शिवसेना आणि भाजपाचे तीन-तीन खासदार आहेत. त्यामुळे भाजपाला यावेळी जास्त जागा हव्यात. त्यामुळे आता शिवसेना किती जागा सोडण्याच्या मनस्थितीत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा