Advertisement

फोटोसेशनसाठी मंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना चेक दिले?, भाजपचा अनिल परब यांच्यावर आरोप

रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना शासकीय मदतीचे चेक देण्यात आले होते. परंतु हे चेक प्रशासनाने परत घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.

फोटोसेशनसाठी मंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना चेक दिले?, भाजपचा अनिल परब यांच्यावर आरोप
SHARES

रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना शासकीय मदतीचे चेक देण्यात आले होते. परंतु हे चेक प्रशासनाने परत घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून भाजपकडून रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करण्यात येत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना व मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदतीचे चेक देण्यात आले होते. राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते खेड तालुक्यातील पोसरे गावात पूरग्रस्तांना मदतनिधीचे चेक देण्यात आले होते. मात्र काही काळानंतर हे चेक प्रशासनाने पुन्हा परत घेतले. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

हेही वाचा- एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल सोमवारीच मिळाली, राजभवनकडून खुलासा

देखाव्याचं सरकार

हे राज्य सरकारच मुळात देखाव्याचं आहे. भावनिक आवाहन शाब्दीक खेळ व देखावा यातच रममाणअसेलेलं हे सरकार. रत्नागिरीत पोसरेत पालकमंत्री अनिल परब यांनी ग्रामस्थांना दिलेले मदतीचे चेक परत घेतले, मृतांच्याकुटुंबियांकडून चेक परत घेतले, फोटोसेशनसाठी मंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना चेक दिले?, असा प्रश्न भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.

तर, जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा रे! अनिल परब तुम्हाला फोटोसेशनची एवढी हौस आहे तर तुमच्या घराजवळच एक फोटोग्राफर आहेत. जे घरी बसूनच असतात. त्यांच्याकडे जायचे. ग्रामस्थांना मदतीचे चेक देण्याची नौटंकी करून त्यांच्या वेदनांवर मीठ का चोळता?, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली. संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा