Advertisement

‘ही’ मुख्यमंत्र्यांनी केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल?, नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यावरून भाजपचा टोला

मुख्यमंत्र्यांना अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करा अशी मागणी करण्याची गरज राज्य सरकारला का वाटली? सवाल भाजपने केला आहे.

‘ही’ मुख्यमंत्र्यांनी केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल?, नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यावरून भाजपचा टोला
SHARES

कोरोना ही नैसर्गिक आपत्ती समजून महाराष्ट्रातील गरीब, दुर्बलांना लॉकडाऊनच्या काळात अर्थसहाय्य करा, अशी विनंती करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांना अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करा अशी मागणी करण्याची गरज राज्य सरकारला का वाटली? सवाल केला आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागणीचा समाचार घेताना माहिती दिली की, वर्षभरापासून केंद्र सरकारकडून आपत्ती निवारण कायद्याच्या अंतर्गत काम चालू आहे. सोबतचा गेल्या वर्षीचा लॉकडाऊनचा आदेश पाहा. अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करा अशी मागणी करण्याची गरज राज्य सरकारला का वाटली? 

राज्यात मदत जाहीर करायची आणि त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्राकडे मागण्या करायच्या. सारे काही केंद्राच्या कुबड्या घेऊनच चालणार असेल तर मग राज्य सरकार नेमकं काय करणार? त्यापेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिलं तर ते राज्याच्या हिताचं होईल, असं केशव उपाध्ये यांनी सरकारला सुनावलं.

केंद्र मदतीसाठी उभं आहे. तुमच्या विनंती नुसार हाफकीनला लस उत्पादनाची परवानगी दिली. पण राज्य म्हणून तुम्ही काही जबाबदारी घेणार ? वर्षभरात रूग्णांसाठी बेड का वाढले नाहीत? ॲाक्सिजन साठा का वाढला नाही ? रेमडेसिवीर रुग्णालयातून मिळतील ही घोषणा केली, त्याची अंमलबजावणी का नाही केली? 

हेही वाचा- राज्यातील गोरगरीब, मजुरांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार, छगन भुजबळ यांचं टीकाकारांना उत्तर

जगावर जेव्हा कोरोनाचं संकट आले आणि आपल्या देशालासुद्धा त्याची झळ बसू लागली तेव्हाच केंद्र सरकारने या संकटाला आपत्ती समजून काम केलं होतं. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कोरोना विरोधातलं हे युद्ध लढण्यासाठी जे आदेश काढण्यात आले ते आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत काढण्यात आलेले आहेत. तसंच या अंतर्गत मदतनिधीसुद्धा देण्यात आलेला आहे, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.

मात्र, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेची दिशाभूल करत आहेत की त्यांचीच दिशाभूल होत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा केंद्राकडे मदतीसाठी लिहिलेल्या पत्रात कोरोना संकटाला आपत्ती घोषित करावी व आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत करण्याची परवानगी मागितली जात आहे. 

कोरोनाच्या (coronavirus) पहिल्या लाटेच्या वेळी एकमात्र महाराष्ट्र राज्य सोडता प्रत्येक राज्यांनी आपापल्या जनतेला अर्थसहाय्य केलेलं (केवळ सहानुभुतीचे पोकळ शब्द आणि आश्वासने दिली नव्हती) मग सरकारला का शक्य नव्हतं? आत्ताही एवढ्या उशीरा मदत करण्याची उपरती झाल्यावर ही मदत करण्यात तांत्रिक अडचण असल्याचं का भासवले जात आहे?

हक्काचे पैसे ‘आगाऊ’ देणार आहेत, सहाय्य नाही. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा गोडगोड शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली आहे. मुळात राज्य सरकार हे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘आगाऊ’ पैसे देणार आहेत जे की त्यांच्या हक्काचेच आहेत त्याहून अधिक असं अर्थिक सहाय्य मुख्यमंत्री देत नाहीत, असं केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केलं.

(bjp spokesperson keshav upadhye criticized maharashtra cm uddhav thackeray on national calamity letter)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा