Advertisement

प्रचारकी डोस! औषधा-औषधांवर अवतरलं भाजप...

भारतीय जनऔषधी परियोजनेच्या नावातील पहिलं अक्षर घेत 'भाजप' असं या योजनेच्या नावाचा शाॅर्टफाॅर्म केला आहे. या योजनेखाली अौषधे उत्पादीत करून ती विक्रीसाठी ठेवताना सरकारने या औषधांच्या पाकिटांवर 'भाजप' असं ठळकपणे छापलं आहे. ही औषधांची पाकिटं जनऔषधी केंद्रातून घराघरात पोहोचत असून त्यातून भाजपाचा प्रचार होत असल्याचं म्हणत राजकीय पक्षाकडून त्यावर आक्षेप घेतला जात आहे.

प्रचारकी डोस! औषधा-औषधांवर अवतरलं भाजप...
SHARES

निवडणुका जसजशा जवळ येताहेत तसतसे भाजपाकडून प्रचारतंत्राचे वेगवेगळे फंडे शोधून काढले जात आहेत. धक्कादायक म्हणजे भाजपाकडून चक्क सरकारी योजनांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार केला जात आहे. याआधी पंतप्रधान आवास योजनेचा वापर करत या प्रकल्पातील घराच्या प्रवेशद्वारावरील आणि स्वयंपाक घरातील टाइल्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचं नक्की करण्यात आलं. आता तर यापुढे जात भाजपानं आणखी एक सरकारी योजना प्रचारासाठी हायजॅक केली आहे, ती म्हणजे भारतीय जनऔषधी परियोजना.


'असा' केला वापर

भारतीय जनऔषधी परियोजनेच्या नावातील पहिलं अक्षर घेत 'भाजप' असं या योजनेच्या नावाचा शाॅर्टफाॅर्म करण्यात आला आहे. या योजनेखाली अौषधे उत्पादीत करून ती विक्रीसाठी ठेवताना सरकारने या औषधांच्या पाकिटांवर 'भाजप' असं ठळकपणे छापण्यात आलं आहे. ही औषधांची पाकिटं जनऔषधी केंद्रातून घराघरात पोहोचत असून त्यातून भाजपाचा प्रचार होत असल्याचं म्हणत राजकीय पक्षांकडून त्यावर आक्षेप घेतला जात आहे.



काय आहे योजना?

रूग्णांना स्वस्तात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान जनऔषधी योजना आणण्यात आली होती. वर्षभरापूर्वी या योजनेचं नाव बदलत ते भारतीय जनऔषधी परियोजना असं करण्यात आलं. योजनेच्या नावात, योजनेच्या संकेतस्थळावर नावातील पहिली अक्षरं 'भाजप' अशा पद्धतीने ठळक आणि भगव्या रंगात छापण्यात आली आहे. ही ठळक अक्षरं या योजनेच्या संकेतस्थळावर, जनऔषधी केंद्रावर झळकू लागली आहेत.



प्रचाराचा फंडा

हा भाजपाचा प्रचाराचा फंडा असल्याचं म्हणत यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेण्यास सुरूवात केली आहे. आधीच्या सरकारच्या काळातील योजनांची नाव बदलायचा सपाटा या सरकारनं लावला होताच. पण आता तर नाव बदलण्याबरोबरच त्या नावातून, सरकारी योजनेतून पक्षाचा प्रचार करण्याचा जो काही ट्रेण्ड सुरू केला आहे तो निषेधार्थ असल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे


७० वर्षाच्या काळात कुणीही सरकारी योजनांचा वापर असा प्रचारासाठी केला नव्हता. पण भाजप ते करत असून प्रचारासाठी वाट्टेल त्या थराला जाणारं भाजप कोणत्या पातळीला जात आहे, हेच यावरून सिद्ध होत आहे. भाजपाची किव करावी वाटते. यासंबंधी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे लवकरच तक्रार करून असा प्रचार त्वरीत बंद करावा अशी मागणी करण्यात येईल.
- राजू वाघमारे, प्रवक्ते, काँग्रेस



हेही वाचा-

इथंही राजकारण! दहावीच्या पुस्तकात भाजपा, शिवसेनेचं गुणगान

नाणारवरून जनतेला 'उल्लू बनाविंग'?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा