Advertisement

नाणारवरून जनतेला 'उल्लू बनाविंग'?

एका बाजूला शिवसेना नाणार प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा अध्यादेश रद्द केल्याचं सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला हा अध्यादेश 'जैसे थे' असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट करत आहेत. एकाच सत्तेत असताना इतकं परस्परविरोधी मतप्रदर्शन करणारं शिवसेना-भाजपा युतीचं हे सरकार आहे की सर्कस? अशा तिखट शब्दात निरूपम यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

नाणारवरून जनतेला 'उल्लू बनाविंग'?
SHARES

नाणार प्रकल्पाच्या नावाखाली शिवसेना आणि भाजपा स्थानिक तसंच राज्यातील जनतेला वेड्यात काढत असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी केली.


सरकार की सर्कस?

एका बाजूला शिवसेना नाणार प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा अध्यादेश रद्द केल्याचं सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला हा अध्यादेश 'जैसे थे' असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट करत आहेत. एकाच सत्तेत असताना इतकं परस्परविरोधी मतप्रदर्शन करणारं शिवसेना-भाजपा युतीचं हे सरकार आहे की सर्कस? अशा तिखट शब्दात निरूपम यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.


मुद्दा राष्ट्रीय स्तरावर नेणार

नाणार प्रकल्पाचा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावर नेत त्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. यासाठी २८ एप्रिलला राज्यातील काँग्रेसचं शिष्टमंडळ अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हास्यास्पद

नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असताना, शिवसेना स्थानिकांच्या बाजूने उभी असताना जमीन संपादनाचा अध्यादेश निघतो कसा? अध्यादेश काढण्याआधी शिवसेनेने याचा विचार केला नाही का? असा सवालही चव्हाण यांनी केला. अध्यादेश रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नसतो हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हास्यास्पद असून हा प्रकार केवळ आणि केवळ राजकीय कुरघोडीसाठी होत असल्याचंही म्हणत चव्हाण यांनी शिवसेना-मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे.


तर, देसाईंचं निलंबन करा

देसाई भरसभेत स्वत: हून अध्यादेश रद्द झाल्याची घोषणा करत असतील आणि ती घोषणा मुख्यमंत्र्यांना चुकीची वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्वरीत देसाईंचं निलंबन करायला हवं होतं. तसं न करता एकमेकांवर कुरघोडी करण्याचंच काम सुरू असल्याचं म्हणत निरूपम यांनी इतका दुबळा मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिला नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली.



हेही वाचा-

नाणारची जमीन परप्रांतीयांच्या ताब्यात कशी? राज ठाकरे

'नाणार' होऊ नाय देणार! मनसेनं फोडलं ताडदेवमधलं प्रकल्पाचं कार्यालय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा