Advertisement

कांदिवलीत गटाराच्या पाण्यामुळे स्थानिक त्रस्त


कांदिवलीत गटाराच्या पाण्यामुळे स्थानिक त्रस्त
SHARES

कांदिवली - वॉर्ड क्रमांक 28च्या एकतानगर परिसरातल्या रामरहिम चाळ समिती सोसायटीत गटाराच्या पाण्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी नगरसेविका गीता यादव यांच्याकडे वारंवार तक्रार केली. गीता यादव यांनी निवडणुका झाल्यानंतर गटाराचे काम करू असे आश्वासन दिले आहे. कारण आता आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच आणखी किती वेळा या गटाराचे काम करायचे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर नगरसेविका जनतेच्या हिताची आणि विकासकामे करत आहे. पण या कामात वापरण्यात येणारे बांधकामाचे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप स्थानिक रहिवासी संजय गुप्ता यांनी केलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement