Advertisement

Coronavirus updates: कोरोनाबाधीतांना आता 'असं' ट्रॅक करणार, जीपीएसवरून ठेवणार लक्ष

कोरोनाच्या संशयितांकडूनच सरकारच्या नियमांचं पालन होत नसल्याने आता अशा संशयितांवर जीपीएस लोकेशनद्वारे नजर ठेवण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.

Coronavirus updates: कोरोनाबाधीतांना आता 'असं' ट्रॅक करणार, जीपीएसवरून ठेवणार लक्ष
SHARES

कोरोनाबाधीतांच्या (Coronavirus,) वाढत्या संख्येमुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. गर्दी टाळण्याचं, घराबाहेर न पडण्याचं आवाहन करूनही लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. खासकरून कोरोनाच्या संशयितांकडूनच सरकारच्या नियमांचं पालन होत नसल्याने आता अशा संशयितांवर जीपीएस लोकेशनद्वारे नजर ठेवण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. 

हेही वाचा- Coronavirus : क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या ६ जणांचा सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून प्रवास

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग (COVID-19) वाढला तो परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे. यातील काही प्रवाशांच्या अनावधानाने आणि काही प्रवाशांनी परदेशातून आल्याची माहिती लपवल्याने कोरोना पसरण्यास मदत झाली. कोरोनाग्रस्तांच्या थेट संपर्कातून त्यांचे नातेवाईक, मित्र इ. कोरोनाच्या तावडीत सापडले. कोरोनाबाधीत १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांना भारतात थेट प्रवेश देण्यात येत नसल्याने काही प्रवासी छुप्या पद्धतीने आडवळणाने भारतात दाखल आहेत.

 नियमांकडे दुर्लक्ष

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विभागणी करून कोरोनाची लक्षणे नसली, तरी ही लक्षणे दिसून येण्यास ८ ते १० दिवसांचा वेळ लागत असल्याने त्यांच्या हातावर स्टॅम्प मारून  १४ दिवस होम क्वोरेंटाईन (home quarantine) राहण्याचा सल्ला त्यांना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. परंतु तरीही काहीजण हा सल्ला धुडकावून काही प्रवासी ट्रेनसारख्या सार्वजनिक वाहनातूक प्रवास करताना आढळून आले आहेत. पालघर रेल्वे स्थानकात ४ आणि बोरीवली स्थानकात ६ जणांना खाली उतरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या व्यक्तींकडून इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्यांना घरातच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. तरीही काही जण हा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. परिणामी, या प्रवाशांच्या मोबाइलवरील जीपीएस लोकेशनद्वारे (mobile gps location) त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

हेही वाचा- Coronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात

मोबाइल ट्रॅक

दक्षिण कोरियामधील सरकारने मोबाइल अ‍ॅपद्वारे लोकांचे लोकेशन ट्रॅक करून संशयित आणि कोरोनाग्रस्त रुग्णांवर लक्ष ठेवलं आहे. त्यानुसार मुंबई विमानतळावरून (airport) परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या मोबाइलवरचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी पोलिसांची मदत मुंबई महापालिका (bmc) प्रशासन घेणार आहे.

होम क्वाॅरेंटाइन असणाऱ्यांचं ट्रॅकिंग करून त्याच्या लोकेशनवर नजर ठेवली जाणार आहे. विमानतळावरच अशा नागरिकांची माहिती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा व्यक्ती बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा