स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस

Mumbai
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस
See all
मुंबई  -  

मुंबई - महापौरपदाच्या स्पर्धेत असलेल्या आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांची घोर निराशा झाल्यानंतर आता या दोघांची वर्णी स्थायी समिती सदस्यपदी लागली आहे. या दोघांबरोबरच रमेश कोरगावकर यांचीही निवड समिती सदस्यपदी झाल्यामुळे आता या समितीच्या अध्यक्षपदासाठी या तिघांमध्ये जोरदार चुरस होणार आहे.

मुंबईच्या स्थायी समितीच्या 26 सदस्यांपैकी 25 सदस्यांची नावे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केली. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या गटनेत्यांनी दिलेल्या पत्रानुसार सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये शिवसेनेकडून यशवंत जाधव, राजुल पटेल, रमेश कोरगावकर, चंगेझ मुलतानी, आशिष चेंबुरकर, संजय घाडी, सुजाता सामंत, समिक्षा सक्रे, सदा गजानन परब, मंगेश सातमकर, भाजपाकडून मनोज कोटक, अलका केरकर, शैलजा गिरकर, राजेश्री शिरवाडकर, प्रभाकर शिंदे, विद्यार्थी सिंह, अभिजित सावंत, मकरंद नार्वेकर, गीता गवळी, पराग शहा आदी तुल्यबळ सदस्य भाजपाने दिले आहेत. काँग्रेसकडून रवी राजा, आसिफ झकेरिया, कमल जहाँ सिद्दीकी, राष्ट्रवादीकडून राखी जाधव आणि सपाकडून रईस शेख यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

सुधार समितीत तीन माजी महापौर?

सुधार समितीवर यापूर्वी श्रद्धा जाधव आणि डॉ. शुभा राऊळ या दोन माजी महापौरांची वर्णी शिवसेनेने लावली होती. परंतु आता नव्या महापालिकेतील सुधार समितीवर चक्क तीन माजी महापौरांची वर्णी लावली आहे. श्रद्धा जाधव यांच्यासह विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य या माजी महापौरांची सुधार समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पण त्याबरोबरच, किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती लावण्यात आल्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदाचा मार्ग खुला झाला आहे.

पक्ष निहाय सदस्यांची नावे

शिवसेना - श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, रमाकांत रहाटे, अनंत नर, स्वप्निल टेंबवलकर, किशोरी पेडणेकर, स्नेहल मोरे, चित्रा सांगळे, मिलिंद वैद्य, किरण लांडगे

भाजपा - उज्ज्वला मोडक, प्रकाश गंगाधरे, महादेव शिवगण, ज्योती अळवणी, शिवकुमार झा, सुनील यादव, सागरसिंह ठाकूर, योगीराज दाभाडकर, हरिश भंदिग्रे, जगदीश ओझा

काँग्रेस - विठ्ठल लोकरे, अश्रफ आझमी, जावेद जुनेजा

राष्ट्रवादी काँग्रेस - ज्योती हारुन खान

समाजवादी पक्ष - अब्दुल कुरेशी

शिक्षण समितीसाठी शीतल म्हात्रे, गुडेकर यांच्यात स्पर्धा

शिक्षण समितीच्या 22 सदस्यांची नियुक्ती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केली आहेत. यामध्ये शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि शुभदा गुडेकर यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे या दोघींमध्ये समिती अध्यक्षपदासाठी स्पर्धा राहणार आहे.

शिक्षण समितीची सदस्यांची पक्षनिहाय यादी

शिवसेना - शीतल म्हात्रे, शुभदा गुडेकर, संध्या दोषी, स्नेहल आंबेकर, जितेंद्र पडवळ, चंद्रावती मोरे, प्रज्ञा भूतकर, सुमंती काते, अंजली नाईक (स्वीकृत सदस्य - राहुल नरे, साईनाथ दुर्गे)

भाजपा - आसावरी पाटील, राम बारोट, सुनिता यादव, त्रिवेदी, पोतदार, श्रीकला पिल्ले, अनिष मकवानी (स्वीकृत सदस्य : आरती पुगावकर)

काँग्रेस - विनी डिसोझा, राजपती यादव, संगीता हंडोरे(स्वीकृत सदस्य - सुरेश सिंह)

राष्ट्रवादी काँग्रेस - सईदा खान

बेस्ट समिती अध्यक्षपदी लागणार अनिल पाटणकर यांची वर्णी

बेस्ट समितीच्या सदस्यपदी शिवसेनेने अनिल पाटणकर यांच्यासह सहा सदस्यांची नियुक्ती केली आहे. दुसरीकडे शिवसेनेतून भाजपात गेलेल्या नाना आंबोले यांची पक्षाने बेस्ट समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. शिवसेनेने नियुक्ती केलेल्या सदस्यांमध्ये अनिल पाटणकर हे अनुभवी नगरसेवक असून अध्यक्षपदी पाटणकर यांची निवड झाल्यास गुरुनंतर चेल्यालाही बेस्ट समिती अध्यक्षपदाचा मान पटकावता येणार आहे.

समिती सदस्यांची पक्ष निहाय नावे

शिवसेना - अनिल पाटणकर, अनिल कोकीळ, सुहास सामंत, कुसळे, हर्षल कारकर, प्रविण शिंदे

भाजपा - अतुल शहा, कमलेश यादव, मुरजी पटेल, सुनील गणाचार्य, संजय (नाना)आंबोले, सरिता पाटील

काँग्रेस - रवीराजा, भूषण पाटील

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.