Advertisement

मुंबईकरांची दिशाभूल करणारे महापौर, आयुक्त माफी मागणार का?

मुंबई महापालिका आयुक्त आणि महापौर मुंबईकरांची माफी मागणार का? असा प्रश्न भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईकरांची दिशाभूल करणारे महापौर, आयुक्त माफी मागणार का?
SHARES

मुंबईतील कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण हळुहळू कमी होत असून ही साथ लवकरच आटोक्यात येईल, असं सांगणारे मुंबई महापालिका आयुक्त आणि महापौर मुंबईकरांची माफी मागणार का? असा प्रश्न भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. (bmc mayor and commissioner should apologize mumbaikars for misleading on corona outbreak status in mumbai says bjp leader kirit somaiya)  

गेल्या आठवड्यात मुंबईत ११,०४५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एक नवीन उच्चांक प्रस्थापित झाला आहे. मुंबईकरांची दिशाभूल करणारे महापौर आणि महापालिका आयुक्त आता माफी मागणार का ? असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांच्या संख्येत रविवार ६ सप्टेंबर रोजी लक्षणीय वाढ झाली. आतापर्यंतची ही सर्वोच्च वाढ असल्याचं आरोग्य विभागातून दिलेल्या माहितीतून स्पष्ट होतं. राज्यात रविवारी दिवसभरात तब्बल २३,३५० नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र अनलॉक ४ आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे.

हेही वाचा - मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

तर अनलॉकनंतर मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे .जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत स्थिरावलेली रुग्णसंख्या वाढत आहे. गणेशोत्सव आणि अनलॉकची सुरु झालेली प्रक्रिया हे मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरणारे घटक आहेत. ऑगस्ट महिन्यात मुंबईत रोज १ हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र, आता पुन्हा दीड हजाराहून अधिक रुग्ण मुंबईत सापडत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी १८ हजारांच्या आसपास असलेले सक्रिय रुग्ण आता २२ हजारांपर्यंत पोहोचले आहेत.  

४ सप्टेंबर रोजी राज्यात २२ हजार २२० सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. ३ सप्टेंबर रोजी २१ हजार ४४२, २ सप्टेंबर रोजी २० हजार ८१३, १ सप्टेंबर रोजी २० हजार ६५ आणि ३१ ऑगस्ट रोजी २० हजार ५५४ सक्रिय रुग्ण होते. मुंबईत शुक्रवारी १९२९, गुरुवारी १५२६, बुधवारी १६२२, मंगळवारी ११४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. 

हेही वाचा - अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत २० टक्के वाढ

संबंधित विषय
Advertisement