'मुंबईकर खड्डे, मलेरिया आणि पाण्याच्या टँकरमध्ये खूश'

  Mumbai
  'मुंबईकर खड्डे, मलेरिया आणि पाण्याच्या टँकरमध्ये खूश'
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईकर खड्डे, पाण्याच्या टँकर,मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारातच खूश असल्याचं काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलंय. मुंबई महापालिकेचा निकाल भाजपा-शिवसेनेच्या बाजूनं लागल्यावर त्यांनी हे ट्विट केलं आहे. तसेच काँग्रेसचा पराभव हा संजय निरूपम आणि गुरुदास कामत यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे झाल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. शिवसेना-भाजपाला शुभेच्छा देत आता पुढची पाच वर्ष तरी मागच्या पेक्षा चांगला कारभार करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.